जयपूरमध्ये २ गॅस टॅंकरच्या धडकेत ५ जणांचा होरपळून मृत्यू, ४० वाहने खाक

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानमधील जयपूर येथे पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये गुरूवारी मध्यरात्री जोरदार धडक झाली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 40 पेक्षा जास्त वाहने आणि एक कारखाना जळून खाक झाला आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो 10 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. घटनेने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे स्थानिक लोक घाबरले आहेत.
ML/ML/PGB 20 Dec 2024