जपानमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

 जपानमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

टोकियो , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जपान दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर भारतीय वेळेनुसार पहाटे साडे चारच्या सुमारास आगमन झाले.

तिथे उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे त्यांना अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमध्ये स्थित भारतीयांनी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले. ज्याप्रमाणे स्थानिक भारतीयांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.
भारतीयांनी गायलेले ‘लाभले आम्हास भाग्य’ या गीताने जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्यासारखे वाटले. जपानमध्ये आल्यानंतर आपली संस्कृती आणि महाराष्ट्रावरचे प्रेम, आपले भारतीय किंचितही विसरले नाहीत अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी! असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

ML/KA/PGB 21 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *