जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि २७
खासदार मिलिंद देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विभागातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना शिवडी प्रभाग क्रमांक 204 च्या वतीने नुकताच शिवडी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपले प्रश्न आणि समस्या लेखी स्वरुपात दिल्या. नागरिकांच्या समस्या संबंधित विवाह पत्र व्यवहार करून लगेच सोडविण्यात येतील असे आश्वासन खासदार मिलिंद देवरा यांनी नागरिकांना दिले. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वात जास्त होते. दक्षिण मुंबईत वेगवेगळ्या प्रभागामध्ये या प्रकारच्या जनता दरबाराचे आयोजन केले जाते.
या जनता दरबारामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकिळ आणि इतर मान्यवर मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS