जालना ते मुंबई रेल्वेचे झाले विद्युतीकरण

 जालना ते मुंबई रेल्वेचे झाले विद्युतीकरण

जालना, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विद्युतीकरण पूर्ण झालेल्या जालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे गाडीचा शुभारंभ आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण काम जोरात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री दानवे यांनी मनमाड ते जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करुन घेतले आहे. तसेच जालना ते उस्मानपूरपर्यंतचे विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे.जालन्यापर्यंतचे विद्युतीकरण जुलैमध्येच पूर्ण झाले होते. सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर घटस्थापनेचा मुहुर्त शोधत रेल्वे विभागाने जालन्यातून मुंबईला डिझेलवर धावणारी ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ विजेवर चालविण्याचा निर्णय घेतला. Jalna to Mumbai railway electrified

त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून आज नव्या विद्युतीकरण झालेल्या जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे गाडीला रेल्वे राज्यमंत्री दानवे हिरवे झेंडी दाखवून रवाना केले. आज पासून जालना रेल्वे गाडी विद्युतीकरणावर धावणार असून रेल्वे प्रवाशांचा प्रवास आज पासून सुखकर आणि जलद गतीने होणार आहे.

ML/KA/PGB
15 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *