तीर्थस्थळासाठी जैन समाज रस्त्यावर
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जैन समाजाचे jain samaj पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्री सम्मेद शिखजी या ठिकाणाला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरुद्ध जैन समाजाच्या वतीने 4 जानेवारी रोजी मुंबईत महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महारॅली मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशी शांततेत व अहिंसेच्या मार्गाने मूक आंदोलन करत निघणार आहे. या रॅलीत सकल जैन समाजाचे लाखों लोक सहभागी होणार आहे अशी माहिती सकल जैन समाज मुंबई,
सम्मेद शिखर बचाओ समितीचे सहसंयोजक
राजेश जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
झारखंड राज्यामध्ये श्री समेद शिखरजी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी जगभरातून अनेक भावी दर्शनासाठी येतात. झारखंड सरकारने या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने
बुधवारी 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मेट्रो येथून ही रॅली निघणार असून ती आझाद मैदानात पोचणार आहे . या ठिकाणी शांततेत आणि अहिंसेच्या मार्गाने जैन समाज मूक आंदोलन करणार आहे. या रॅलीत सकल जैन समाजाचे लाखो बांधव सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या रॅलीत कोल्हापूर व सांगली येथील दिव्यागं
देखील सहभागी होणार आहे.
श्री सम्मेद शिखरजी आणि गुजरातच्या पालीताना येथील मंदिराचे पावित्र्य कायम राहावे यासाठी या ठिकाणांना तीर्थक्षेत्रच राहू द्या. सम्मेद शिखजी या ठिकाणाला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या जो निर्णय घेतला तो रद्द करण्यात यावा, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, इत्यादी मागण्यासाठी जैन समाजाच्या वतीने ही महारॅली शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे,असे जैन यांनी सांगितले.
ML/KA/PGB
3 Jan 2022