विदेशी बाजारातील चांगले संकेत, पावसाची उत्तम सुरुवात व कोरोना रुग्णसंख्येतील घट या जोरावर सेन्सेक्स व निफ्टीचा नवा उच्चांक

 विदेशी बाजारातील चांगले संकेत, पावसाची उत्तम सुरुवात व कोरोना रुग्णसंख्येतील घट या जोरावर सेन्सेक्स व निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावरती पावसाची समाधानकारक सुरुवात, विदेशी बाजारातील चांगले संकेत,कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी घट,लसीकरण मोहिमेचा वेग, आणि अर्थव्यवस्थेला लवकरच ताळेबंदीच्या शिथिलतेने चालना मिळेल हा आशावाद या सगळ्याचा प्रभाव राहिला. आय.टी,फार्मा व मेटल सेक्टर च्या जोरावरती या आठवड्यात सेन्सेक्स आणि  निफ्टीने नवीन उच्चतम स्तर गाठला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी. The Sensex and Nifty hit new highs this week

 

सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रमी बंद भाव Sensex, Nifty Close At Record High

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नजरेची सुरुवात तेजीने झाली. पावसाने जोर पकडला असून, महाराष्ट्रातील ३० टक्के भाग पावसाने व्यापला आहे व मुंबईत देखील २/३ दिवसात त्याचे आगमन होईल या सकारात्मक बातमीने मार्केट मध्ये अजून जोश भरला.परंतु थोड्यावेळेने मार्केट मध्ये उतार चढाव सुरु झाला. परंतु पंतप्रधान संध्याकाळी जनतेशी सवांद साधणार या बातमीने दुपारनंतर बाजारात उत्साहाचे वातावरण पसरले. बाजाराने विक्रमी स्तर गाठला. तेजीवाल्यानी पुन्हा बाजारावर आपली पकड ठेवली. आयटी(I.T),एनर्जी(ENERGY),एफ.एम.सी.जी(FMCG),वाहन(AUTO),साखर(SUGAR) या क्षेत्रातील शेअर्स मध्ये तेजी होती. मिडकॅप शेअर्स मध्येही चांगलाच जोश होता. Markets end higher with Nifty above 15,750 supported by the IT, infra and energy names.

दिवसभरातील उतारचढावानंतर बाजाराने दिला सपाट बंद.Sensex,Nifty Close Flat After A Volatile Session.

संमिश्र विदेशी संकेताच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली. २ एप्रिल नंतर प्रथमच पहिल्यांदा कोरोना रुग्णसंख्या ९०हजारांच्या खाली नोंदवली गेली.सोमवारी संध्याकाळी पंतप्रधानांनी २१ जून नंतर १८ वर्षावरील लोकांचे  मोफत लसीकरण होईल असे जाहीर केले.मंगळवारी मार्केटचा व्यवहार एका विशिष्ट स्तराभोवती फिरत होता. बाजरातील रेकॉर्ड तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली करणे पसंत केले. फार्मा(Pharma),एफएमसीजी(FMCG),तसेच शुगर(Sugar) क्षेत्रातील शेअर्स मध्ये चांगली खरेदी झाली. बँकिंग सेक्टर(Banking) वरती दबाव होता. आय.टी(I.T) इंडेक्स रेकॉर्ड स्तरावरती बंद झाला. मिडकॅप इंडेक्सने पहिल्यांदाच २७,००० च्या वरील भावावर बंद भाव दिला. Sensex, Nifty End Marginally Lower; Banking Shares Fall, IT Stocks Gain.

गुरुवारी जाहीर होणाऱ्या युरोपिअन बँकेचे पतधोरण व अमेरिकेतील महागाईचे आकडे यामुळे बाजारावर दबाव. Sensex, Nifty Fall For Second Day Ahead Of U.S. Consumer Price Data 

बुधवारी बाजाराची सुरुवात ठीकठाक झाली. निफ्टीने सलग पाचव्या दिवशी१५,८००चा विक्रमी उच्चतम स्तर गाठला.मिडकॅप ,स्मालकॅप कंपन्यांमध्ये सुद्धा चांगलीच तेजी होती.ऊर्जा तसेच बांधकाम क्षेत्रातील शेअर्स मध्ये जबरदस्त वाढ झाली. परंतु कमजोर विदेश बाजार आणि विक्रमी स्तरावरती नफावसुली या कारणांमुळे दुपारी सेन्सेक्स चांगलाच गडगडला सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची घसरण झाली. युरोपिअन मार्केट सुरू झाल्यानंतर मार्केटमध्ये नफावसुली जोरात झाली.गुरुवारी युरोपिअन सेंट्रल बँकेचे(ECB) पतधोरण तसेच अमेरिकेतील महागाईचे आकडे जाहीर होणार असल्याने बाजारात दबाव वाढला.बुधवारी सेन्सेक्स ३३३ अंकांनी घसरून  ५२,००० च्या खाली बंद झाला.Markets end the day with losses of a little over half a per cent, amid heightened volatility, due to profit-booking at higher levels

दोन दिवसांच्या पडझडीनंतर बाजारात तेजी. Sensex, Nifty Snap Two-Day Losing Streak As Bajaj Twins Lead Lenders Higher.         

गुरुवारी विदेशी बाजारातील मजबूत संकेताच्या जोरावर विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीने झाली.पॉवर(POWER) आणि फार्मा(PHARMA) क्षेत्रात जबरदस्त तेजी  होती डिव्हिस लॅब(DIVIS),ग्लेनमार्क(GLENMARK),सिप्ला(CIPLA),फायझर(PFIZER) ह्या शेअर्स मध्ये चांगलीच वाढ झाली. निफ्टी फार्मा इंडेक्सने लाईफ टाईम उच्चतम स्तर गाठला.रिलायन्स(RIL) ,इन्फोसिस(INFOSYS),बजाज फायन्यांस(BAJAJ FIN) या शेअर्स मधील वाढीने मार्केटला आधार मिळाला.१५-१६ जून ला अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ची बैठक होणार असून बाजारचे लक्ष या बैठकीकडे आहे. बाजार बंद होताना उच्चतम स्तरावरती बंद झाला. सेन्सेक्सने ५२,००० च्या वरती बंद दिला. Markets end higher with Nifty above 15,700 led by the realty, PSU bank, metal and pharma names.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजीवाल्यांचे पारडे जड राहिले.बाजरीची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमाची नोंद केली. सेन्सेक्सने १६ फेब्रुवारी २०२१ नंतर नवीन विक्रमी उच्चतम स्तर गाठला.निफ्टीने १५,८०० चा स्तर पार केला व मिडकॅप इंडेक्सने सुद्धा नवीन विक्रम केला. सरकारी कंपन्या,आय.टी.फार्मा,मेटल या क्षेत्रात जबरदस्त तेजी होती. रिलायन्स ,इन्फोसिस,टी.सी.एस हे शेअर्स खूप वाढले. Market bulls rode the global momentum on Dalal Street, hitting new lifetime highs on the way. Markets end at record closing high on the back of buying seen in the IT, metal and pharma names.

शुक्रवारी संध्याकाळी औदयोगिक उत्पादनाचे(IIP DATA) आकडे जाहीर झाले एप्रिल महिन्यात १३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे परंतु एप्रिल २०२० हे वर्ष आधारभूत(Base Rate) धरल्याने हि वाढ दिसत आहे. India’s industrial production rose 134.4% in April from a year ago, boosted by the low base in April 2020

(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com

JS/KA/PGB
12 Jun 2021

mmc

Related post