भारतीय अर्थव्यवस्थेवर सन२०२५ पर्यत होणार कोरोनाचा वाईट परिणाम : ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स 

 भारतीय अर्थव्यवस्थेवर सन२०२५ पर्यत होणार कोरोनाचा वाईट परिणाम : ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स 

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना विषाणूचा प्रभाव 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेवर कायम राहील आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला या साथीचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वाधिक नुकसान होईल. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स या आंतरराष्ट्रीय संस्थेने आपल्या ताज्या जागतिक अहवालात हा अंदाज केला आहे की 2025 पर्यंत भारताचा पर कॅपिटा जीडीपी कोविडच्या आधीच्या तुलनेत १२ टक्क्यांपर्यंत कमी राहील. जगाच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी संस्था ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने भारतीय अर्थव्यवस्थेवरील आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की 2020 ते 2025 दरम्यान आर्थिक विकास दर कोविडच्या साथीच्या आधीचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून घसरुन केवळ 4.5.टक्के होण्याचा पूर्वानुमान आहे. Corona has a very bad effect on Indian economy, will remain impact till 2025
ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या अर्थशास्त्रज्ञ प्रियांका किशोर यांनी सांगितले की, खासगी मागणीत सुधारणा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आणि विस्तृत फिस्कल रिस्पॉन्स नसल्याने आम्हाला आढळले आहे की या साथीने भारताला कोविडपूर्व परिस्थितीपेक्षा आणखी वाईट परिस्थितीत ढकलले आहे. याचा थेट परिणाम म्हणून जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे सर्वाधिक नुकसान होईल. आमचा अंदाज आहे की 2025 पर्यंतही भारताचा पर कॅपिटा जीडीपी कोविडच्या आधीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी कमी राहील. Corona has a very bad effect on Indian economy, will remain impact till 2025
दुसरीकडे, कमकुवत होत असलेल्या अर्थव्यवस्थे संदर्भात उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे विरोधी पक्षांना सरकारला लक्ष्य करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. कॉंग्रेसने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात होणारी वाढ 30 जून 2021 पर्यंत थांबविण्याच्या सरकारच्या निर्णयाला शुक्रवारी विरोध केला. याचा परिणाम 339 केंद्रीय सार्वजनिक उपक्रमातील 14.5 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांवर होईल. Corona has a very bad effect on Indian economy, will remain impact till 2025
कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी सांगितले की सरकारला आपल्या अथक आर्थिक गैरव्यवस्थेचा स्वीकार करण्यासाठी आणखी पुराव्यांची काय आवश्यकता आहे ? जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक असतानाही आता आपण सर्वात मंद गतीने वाढणार्‍या 7 अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत. सरकार एकमेव कोरोनाच्या पाठी लपू शकत नाही कारण कोरोनापूर्वी पासूनच अर्थव्यवस्था कोलमडली होती, कोरोनापूर्वीच आठ सलग तिमाहीत आर्थिक विकासामध्ये घट तर झालीच. Corona has a very bad effect on Indian economy, will remain impact till 2025
कोरोनाचे वाढते संकट अर्थव्यवस्थेतील आव्हाने देखील वाढवित आहे हे स्पष्ट आहे. भारत सरकार या समस्यांचा आणि अर्थव्यव्स्थेवरील संकटाचा कसा सामना करते हे पहाणे महत्वाचे ठरेल.
#Corona bad effect on Indian economy, will remain impact till 2025
PL/KA/HSR/21 NOV 2020

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *