300 भारतीय बॅंकावर सायबर हल्ला, पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद

 300 भारतीय बॅंकावर सायबर हल्ला, पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॅन्समवेअर हल्ल्यामुळे देशभरातील सुमारे 300 छोट्या बँका आणि वित्तीय संस्थांचे बँकिंग कामकाज ठप्प झाले आहे. हा सायबर हल्ला टेक्निकल सेवा पुरवणाऱ्या सी-एज टेक्नॉलॉजीजवर झाला आहे. कंपनी देशभरातील छोट्या बँकांना बँकिंग तंत्रज्ञान प्रणाली प्रदान करते. त्यामुळे या बँकांची पेमेंट सिस्टीम तात्पुरती बंद झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबंधित दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली.या सायबर हल्ल्याचा फटका सहकारी बँका आणि ग्रामीण प्रादेशिक बँकांच्या ग्राहकांना बसला आहे. या बॅंका एसबीआय आणि टीसीएसच्या संयुक्त उपक्रम सी-एज टेक्नॉलॉजीजवर अवलंबून आहेत. त्यामुळे ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. त्याचबरोबर UPI द्वारे रक्कम ट्रान्सफर करताना अडचणी येत आहेत.
या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सॉफ्टवेअर कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. तसेच अद्याप कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. सायबर हल्ल्यानंतर कोणत्याही संभाव्य धोक्यापासून रोखलं जावं यासाठी या बँकांची पेमेंट सिस्टीम तात्पुरती बंद झाली आहे.

300 भारतीय बॅंकावर सायबर हल्ला, पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद

TR/ML/PGB
1 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *