#जीडीपीमध्ये 10.1 टक्के वाढ होण्याचा अंदाज

 #जीडीपीमध्ये 10.1 टक्के वाढ होण्याचा अंदाज

मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशांतर्गत पतमानांकन संस्था इक्रा रेटिंग्जने सोमवारी सांगितले की, त्यांना वित्तीय वर्ष 2022 मध्ये देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 10.1 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र त्यांनी असेही म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्षात जीडीपीचे एकूण मूल्य आर्थिक वर्ष 2020 मध्ये प्राप्त केलेल्या पातळीपेक्षा किंचित जास्त असेल.
संस्थेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी एका अहवालात म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात कोरोना विषाणूच्या साथीमुळे 7.8 टक्क्यांच्या घसरणीनंतर 2021- 22 या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक जीडीपी 10.1 टक्क्यांनी वाढू शकेल. ही वाढ आर्थिक घडामोडी सामान्य होत जाणे, कोरोनाच्या लसीकरणाची सुरुवात होणे आणि एक वर्षापूर्वीचा निम्न आधार यामुळे होईल.
त्यांनी सांगितले की आम्ही खर्‍या अर्थाने, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष 2020 च्या पातळीपेक्षा किंचित जास्त असण्याची अपेक्षा करत आहोत. संस्थेला किरकोळ महागाई आर्थिक वर्ष 2021 मधील 6.4 टक्क्यांवरून कमी होऊन ती आर्थिक वर्ष 2022 मध्ये 4.6 टक्क्यांवर येण्याची अपेक्षा आहे. मात्र ती सलग तिसर्‍या वर्षी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीला (एमपीसी) दिलेल्या चार टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त राहू शकते.
Tag-India/GDP/Icra Ratings
PL/KA/PL/12 JAN 2021
 

mmc

Related post