#भारत आजही 5000 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दीष्टावर ठाम
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 साथीचा मोठा धक्का बसला असतानाही सरकार 2024-25 पर्यंत 5,000 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ( 5 Trillion Dollar Economy ) आपले उद्दिष्ट गाठण्यावर ठाम आहे. आर्थिक घडामोडींचे सचिव तरुण बजाज यांनी गुरुवारी सांगितले की अर्थसंकल्पात (Budget) पायाभूत सुविधा क्षेत्रावर (infrastructure sector) विशेष भर देण्यात आला आहे तसेच इतर काही उपाय योजण्यात आले आहेत.
त्यांचे 5,000 अब्ज अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट साध्य करण्याचे लक्ष्य आहे. सोमवारी सादर झालेल्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रावरील खर्च वाढविणे, आरोग्य सेवा (Healthcare) आणि कृषी क्षेत्राची (agricultural sector) क्षमता वाढविणे आणि मालमत्तांमधून कमाई (Monetisation) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या निर्णयांचे उद्देश कोव्हिड-19 चा परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे हा आहे.
बजाज यांनी सांगितले की आम्ही लक्ष्यात सुधारणा केलेली नाही. आम्ही त्यात प्रगती करत आहोत. पायाभूत सुविधा क्षेत्रावरील खर्च आणि सरकारकडून करण्यात आलेले अन्य उपाय यांचा उद्देश लक्ष्य साध्य करणे आहे. अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार पायाभूत क्षेत्रावरील खर्च 4.12 लाख कोटी रुपयांवरून वाढवून 2021-22 मध्ये 5.54 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रासाठीचा खर्च 94,000 हजार कोटी रुपयांवरून वाढवून 2.23 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे.
Tag-India/5 Trillion Dollar Economy/Budget
PL/KA/PL/5 FEB 2021