या पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

 या पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकरी वर्ग आता शेती मशागत करून आता मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. त्यातच केंद्र सरकारने आज झालेल्या बैठकीत सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या हमीभावात वाढ केल्याचे जाहीर केल्याने बळीराजा सुखावला आहे. केंद्र सरकारने आज येत्या खरीप हंगामासाठी म्हणजे २०२३-२४ साठी पिकांच्या किमान आधारभूत किंमती- (MSP) जाहीर केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने आधारभूत किंमतींना मान्यता दिली.आधारभूत किंमती हमीभाव म्हणून ओळखल्या जातात.

२०२३-२४ या हंगामासाठी MSP (प्रती क्विंटल) गतवर्षीची MSP (प्रती क्विंटल)

सोयाबीन – ४६०० रूपये ४३०० रूपये
मध्यम धाग्याचा कापूस – ६६२० रूपये ६०८० रूपये
लांब धाग्याचा कापूस ७०२० रूपये ६३८० रूपये
तुर – ७००० रूपये ६६०० रूपये
मूग ८५५८ रूपये ७७५५ रूपये
उडीद ६९५० ६६०० रूपये

केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किंमतींच्या शिफारशी केंद्र सकारला केल्या होत्या. शेतकऱ्यांना किफायतशीर मोबदला मिळावा आणि पिकांमध्ये वैविध्य यावे, यासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये भरीव वाढ करण्यात आली असल्याचा दावा केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.

SL/KA/SL
7 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *