या मुस्लीमबहुल देशात हिजाब, बुरखा घालण्यास बंदी

 या मुस्लीमबहुल देशात हिजाब, बुरखा घालण्यास बंदी

दुशान्बे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील काही मुस्लीम राष्ट्रे कट्टर परंपरावादी असली तरीही काही मुस्लीम राष्ट्रे मात्र काळानुरुप परिवर्तन स्वीकारत आहेत. इस्लाममधील जाचक कायद्यांचा त्याग करत आहेत. यामध्ये सध्या प्रामुख्याने चर्चेत असलेले मुस्लीम बहुल राष्ट्र म्हणजे मध्य आशियातील ताजिकिस्तान. ताजिकिस्तानच्या संसदेच्या वरच्या सभागृह मजलिसी मिलीने 19 जून रोजी विधेयक मंजूर केले. ज्यामध्ये ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अझहा दरम्यान मुलांच्या परदेशी पोशाखावर बंदी घालण्याची तरतूद आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह मजलिसी नमोयांदगोन यांनी 8 मे रोजीच विधेयक मंजूर केले होते आणि बुरखा आणि हिजाब यांसारखे विदेशी कपडे घालण्यावर बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. संसदेत याबाबत कायदा मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तेथे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ताजिकीस्तान हा सोव्हिएत युनियनपासून वेगळा झालेला देश आहे. या देशाच्या सीमा तालिबान शासित अफगाणिस्तानशी लागून आहेत. अशा परिस्थितीत शेजारील अफगाणिस्तानात बुरखा घालणे अनिवार्य असल्याने हिजाब आणि बुरखा घालण्यावर बंदी घातल्याने संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे.

विधेयकावरील चर्चेदरम्यान, ताजिकिस्तानच्या संसदेने सांगितले की, महिलांचे चेहरे झाकणारा बुरखा हा ताजिक परंपरा किंवा संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे या विदेशी पोशाखांवर बंदी घातली आहे. अध्यक्ष रुस्तम इमोमाली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदेच्या 18 व्या अधिवेशनात सांस्कृतिक पद्धती, मुलांचे संगोपन करताना शिक्षकांची भूमिका आणि पालकांची कर्तव्ये यांच्याशी संबंधित कायदेही बदलले. ताजिकिस्तानमध्ये लग्न आणि अंत्यसंस्काराच्या मेजवानीवरही बंदी आहे.

या नवीन नियमांचे कोणी उल्लंघन केले तर त्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूदही कायद्यात करण्यात आली आहे. विधेयकातील तरतुदींनुसार, व्यक्तींना 7,920 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो, तर कंपन्यांना 39,500 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो. अधिकाऱ्यांना 54,000 आणि धार्मिक नेत्यांना 57,600 सोमोनी दंडाचा सामना करावा लागेल.

SL/ML/SL

21 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *