२०२३ या वर्षातील पहिल्याच आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण.

 २०२३ या वर्षातील पहिल्याच आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण.

मुंबई, दि. 07 (जितेश सावंत):  २०२३ या वर्षातील पहिल्याच आठवड्यात बाजारात मोठी घसरण झाली.6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजार 1 टक्क्यांहून अधिक घसरला.पहिल्या 2 सत्रांमध्ये तेजी केल्यानंतर शेवटच्या तीन दिवसात बाजारात घसरण पाहावयास मिळाली.गुंतवणूकदारांनी पुढील आठवड्यात तिसर्‍या तिमाहीच्या कमाईपूर्वी (Q3 earnings) नफा बुकींग सुरू केल्यामुळे आणि फेडरल रिझर्व्हकडून पुढील दरात वाढ होण्याचे संकेत मिळाल्यामुळे बाजारावर दबाव वाढला.युक्रेनने रशियाची 36 तासांची युद्धविराम(ceasefire) ऑफर नाकारली आणि RBI गव्हर्नरने दक्षिण आशियातील चलनवाढीच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केलेल्या चिंतेमुळे तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIS) केलेल्या जोरदार विक्रीमुळे बाजार कमजोर झाला.

शुक्रवारी अमेरिकन बाजारात (US Market, Dow closes up 700 points) मोठी तेजी पाहावयास मिळाली. 2023 ची पहिली मोठी रॅली. डिसेंबरच्या नोकऱ्यांचा अहवाल आणि आर्थिक सर्वेक्षणाने महागाईत घट होण्याची चिन्हे निर्माण झाली यामुळे बाजार वधारले (December jobs report and economic activity survey showed signs that inflation may be cooling)

शुक्रवारी US jobs dataचे सकारात्मक संकेत European Markets वर होतांना देखील दिसले शुक्रवारी युरोपियन बाजार सुमारे 1% वाढले. नोव्हेंबरपासूनचा बाजारासाठी नोव्हेंबरपासूनचा सर्वोत्तम आठवडा ठरला.

गुंतवणूकदारांचे लक्ष येणाऱ्या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या Q3 earnings तसेच.१२ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या भारताच्या CPI Inflation डेटा तसेच, IIP Growth डेटा यांच्या कडे असेल.९ जानेवारी रोजी TCS, १२ जानेवारी रोजी HCL TECH ,INFOSYS १३ जानेवारी रोजी WIPRO व १४ जानेवारी रोजी HDFC BANKयांचे तिमाही निकाल जाहीर होतील

भारतीय बाजाराची सुरुवात देखील सोमवारी सकारात्मक होईल.

Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने 17838 चा स्तर तोडला व 17795 चा स्तर गाठला. शुक्रवारी निफ्टीने 17859 चा बंद दिला. बाजार ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे वर जाण्याकरिता निफ्टीने हे 17969-17992-18080-18,100 हे स्तर पार करणे आवश्यक आहे.हे स्तर निफ्टीने पार केले तर निफ्टी 18230-18243-18265-18318 हे स्तर गाठू शकते तसेच निफ्टीला 17795-17723 हे स्तर राखणे जरुरी आहे अन्यथा निफ्टीत मोठी घसरण होऊ शकते. .

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रात बाजार वधारला.

भारतीय बाजाराची २०२३ या वर्षातील पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. गुंतवणुकदारांनी नवीन वर्षाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. दिवस जसजसा वाढत गेला तसतशी बाजारातील तेजी वाढत गेली.तथापि, इंट्राडेमध्ये काही नफा बुकिंग दिसून आले. परंतु दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बाजार बंद झाला.सेन्सेक्स ३५० अनेकांनी वधारला ,मेटल सेक्टरचा या वाढीसाठी मोठा हातभार लागला. चीनने त्यांच्या देशांतर्गत मागणीला पाठिंबा देण्यासाठी निर्यात शुल्क वाढवल्याच्या वृत्तानंतर मेटल स्टॉकमध्ये वाढ झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 327. अंकांनी वधारून 61,167 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 92 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,197 चा बंद दिला.

सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांक वाढले. Indices ended higher for the second consecutive day

मंगळवारी शांत सुरुवातीनंतर सत्राचा बहुतेक वेळ बाजार सकारात्मक परंतु सपाट राहिला. निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी वाढले. बाजाराने आपले लक्ष या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या Q3 निकालाकडे केंद्रित केले होते. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 126 अंकांनी वधारून 61,294 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 35 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,232 चा बंद दिला.

बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला

बुधवारी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली व दिवस जसा पुढे सरकत गेला तसा विक्रीचा जोर वाढत गेला. निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्सने अनुक्रमे 18,020.60 आणि 60,593.56 ची इंट्राडे नीचांकी पातळी गाठली.भारतीय बेंचमार्क निर्देशांक एक टक्क्याने घसरले,रात्री उशिरा जाहीर होणाऱ्या FOMC मिनिटे आणि यूएस मॅन्युफॅक्चरिंग PMI डेटाच्या निकालापूर्वी गुंतवणूकदारानी सावध भूमिका घेतली.सेन्सेक्स ७०० अंकांपेक्षा जास्त घसरला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 636 अंकांनी घसरून 60,657 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 189 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,043 चा बंद दिला.

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण

गुरुवारी यूएस बाजारांच्या मजबूत बंदमुळे तसेच इतर आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सकाळी बाजार एक मजबूत नोटवर उघडले.परंतु वीकली एक्सपायरी आणि युरोपीय बाजाराच्या कमजोर ओपनिंगमुळे बाजारातील अस्थिरता वाढली व गुंतवणूकदारांचा कल नाकारत्मकतेकडे झुकला परिणामी बाजार घसरला. सेन्सेक्स ६०० अंकांनी गडगडला.यूएस फेडच्या बैठकीमुळे बाजारांमध्ये मंदी निर्माण होईल या भीतीने बाजरातील अस्थिरता अजूनच वाढली.आणि त्यात भर पडली ती विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बाजारातून सतत पैसे काढून घेतल्याने आणि बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीमुळे.बाजार सलग दुसऱ्या दिवशी लाल रंगात बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 304 अंकांनी घसरून 60,353 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 51 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,992 चा बंद दिला.

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व सलग तिसऱ्या दिवशी बाजारात चहुबाजुंनी विक्रीचा मारा पाहावयास मिळाला ,आदल्या दिवशीच्या यूएस बाजारातील नकारात्मक संकेतांचा प्रभाव भारतीय बाजारावर सकाळी पाहावयास मिळाला. युक्रेनने रशियाची 36 तासांची युद्धविराम ऑफर नाकारली आणि RBI गव्हर्नरने दक्षिण आशियातील चलनवाढीच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केलेल्या चिंतेमुळे व यूएस फेडच्या दर वाढीबद्दलच्या कठोर भूमिकेमुळे नकारात्मक भावना वाढली यातच जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या मंदीच्या वाढत्या चिंतेमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIS) केलेल्या जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्सने ६०० अंकांची गटांगळी खाल्ली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 453 अंकांनी घसरून 59,900 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 133अंकांची घट होऊन निफ्टीने 17,859 चा बंद दिला.
(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत ) jiteshsawant33@gmail.com)

ML/KA/PGB
07 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *