महाराष्ट्रात आम्हीही कर्नाटकच्या मंत्र्यांना बंदी घालू शकतो

 महाराष्ट्रात आम्हीही कर्नाटकच्या मंत्र्यांना बंदी घालू शकतो

कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना बंदी करू शकतो, पण तसं करणार नाही, सामोपचारानं प्रश्न मिटावेत; असं शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? अशा शब्दांत शालेय दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारला टोला लगावला. महाराष्ट्रात आमचं सरकार असल्यानं आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबईत आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो, पण तसं आम्ही करणार नाही. त्यांनी अविचारानं निर्णय घेतला, तर तसाच आपणही घेणं हे योग्य नाही, सामोपचारानं प्रश्न सुटले पाहिजेत, अशी आमची इच्छा असल्याचं केसरकर म्हणाले.

केसरकर यांनी कर्नाटक मुद्यावरून तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं. केसरकर म्हणाले, कोणत्याही धरणाचं पाणी सोडलं, की प्रश्न सुटतात असं नाही. पाणी योजनेसाठी 2 हजार कोटी आम्ही दिले आहेत. कर्नाटककडून सीमा भागातील नागरिकांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते हे सर्वांना माहीत आहे. कर्नाटक त्यांच्या लोकांना बहुभाषा सुविधा देखील देऊ शकले नाहीत.

न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूनंच लागेल हा आमचा विश्वास आहे, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं. दीपक केसरकर यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.In Maharashtra we can also ban Karnataka ministers

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हानाची भाषा केली जाते, पण तुम्ही गुन्हा केला म्हणून तुम्ही तुरुंगामध्ये होता. मात्र, सीमावादासाठी शिंदेंनी आंदोलन केलं म्हणून ते कर्नाटक मधील जेलमध्ये 45 दिवस होते.

यावेळी राज ठाकरे यांच्यावर केसरकर यांनी अधिक बोलणं टाळलं. ते म्हणाले, राज ठाकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलणं मला योग्य नाही. पैशानं माणसं फुटत असती आणि विकत घेता येत असती, तर सर्व उद्योगपती नेते बनले असते. एकनाथ शिंदे यांच्या मागे लोक का गेले? याचा सर्वांनी विचार करायला हवा. अधिवेशन काळात शिंदेंच्या घराकडून सर्व आमदारांना जेवणाचा डबा येत होता.

केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही आमदारांना कधी प्रेम देऊ शकला नाही भेटू शकला नाही. तुम्हाला हिंदुत्व सुद्धा मान्य नव्हतं.तुम्हाला सावरकरांचा झालेला अपमान मान्य होता. मात्र, बाळासाहेब असते तर त्यांना हे सर्व मान्य झालं नसतं. म्हणून आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाले. मागे राहिलेल्या लोकांनाही हे सत्य लवकरच समजेल.

शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे कटकारस्थान होते, त्याला उद्धव ठाकरे बळी पडले. आम्ही जनतेशी वफादर म्हणून तुम्ही काहीही बोलला, तरी आम्हाला फरक पडत नसल्याचं ते म्हणाले.

ML/KA/PGB
3 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *