जागतिक बाजारातील अस्थिरतेचा भारतीय बाजारावर( Stock Market)असर.

 जागतिक बाजारातील अस्थिरतेचा भारतीय बाजारावर( Stock Market)असर.

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत.

गेल्या आठवडयातील प्रचंड घसरणी नंतर बाजाराने या आठवडयात GDPव GSTच्या चांगल्या आकड्यांमुळे सावरण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या दिवशी बाजार पुन्हा कोसळला. जागतिक बाजारात सध्या नव्या विषाणूच्या चिंतेमुळे प्रचंड अस्थिरता जाणवत आहे. अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी भीती बाजाराला आहे. बाजार या विषाणूच्या संबंधीच्या स्पष्टतेची वाट बघत आहे. निफ्टीने या आठवडयात १७,४८९ चा वरचा स्तर गाठला. तांत्रिकद्रुष्ट्या निफ्टीला खालच्या स्तरावर १७,००० चा चांगला सपोर्ट आहे जर तो तुटला तर निफ्टी,१६९००,-१६,८०० चा स्तर गाठू शकते तसेच १७,२०० च्या वरती निफ्टी १७,३००-१७,५००-१७,६०० चा स्तर गाठू शकते.Impact of global market volatility on the Indian stock market.

या आठवडयात बाजारावर नव्या विषाणूची धास्ती,जागतिक बाजारातील अस्थिरता,.Moderna कंपनीच्या सी.ई.ओंचे(CEO)वक्तव्य,GDPआणि GSTचीआकडेवारी,वीकली एक्सपायरी,.कर्नाटकमध्ये नव्या विषाणूचे सापडलेले दोन रुग्ण,Star Health IPOला मिळालेला कमी प्रतिसाद,Reliance Industries मधील पडझड याचा प्रभाव जाणवला. या आठवडयात FII नी १२,४५० करोड रुपयांची विक्री व DII नी १४,८०० करोड रुपयांची खरेदी केली .

येणाऱ्या आठवडयात गुंतवणूकदारांचे लक्ष खास करून ६ते ८डिसेंबर होणाऱ्या RBI Monetary Policy मीटिंग,६ डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे भारतातील आगमन ,जपानचे Q3 GDP चे आकडे,८डिसेंबर रोजी जाहीर होणारा RBI Policyचा निर्णय तसेच १० डिसेंबर रोजी ऑक्टोबर महिन्याचे IIPचे आकडे या कडे असेल.

बाजारात खरेदी निफ्टी १७,००० च्या वरती. Nifty ends above 17,000

मागील सत्रातील प्रचंड घसरणीनंतर सोमवारी बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली परंतु दिवसभरात बाजारात खालच्या स्तरावरून चांगलीच खरेदी झाली.आशियाई बाजारातील वातावरण नव्या विषाणूच्या (new Covid variant) धास्तीने नकारात्मक होते.जागतिक अर्थव्यवस्थेला नव्या विषाणूमुळे धोका निर्माण होईल अशी भीती बाजाराला आहे. सोमवारी बाजारातचढउतारअधिकहोते. बाजार बंद होताना सेन्सेक्स 153 अंकांनी वधारून ५७,२६० या स्तरावर बंद झाला व निफ्टी २७ अंकांनी वधारून १७,०५४चा बंद दिला.Market ends higher amidvolatility.

बाजारात घसरण निफ्टी १७,००० च्या खाली. Nifty below 17,000

मंगळवारी बाजाराच्या कामकाजात प्रचंड चढउतार दिसला. चांगली झाली. निफ्टीने १७,३०० चा टप्पा गाठला परंतु जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारानी नफावसुलीला प्राधान्य दिले.बाजाराने पुन्हा तेजी पकडली परंतु ती टिकली नाही बाजार बंद होताना घसरला.Moderna कंपनीच्या CEO यांनी नव्या विषाणूवर (Omicron) लसीचा परिणाम होणार नाही असे वक्तव्य केल्यामुळे बाजार अजून अस्थिर झाला.बाजाराचे लक्ष संध्याकाळी जाहीर होणाऱ्या gross domestic product data (GDP)कडे होते.मेटल(Metal)बँकिंग(Banking),ऑटो(Auto) आणि पॉवर(Power) क्षेत्रात चांगलीच घसरण झाली. आय.टी(I.T),एफ.एम.सी.जी(FMCG) क्षेत्रात खरेदी झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरून ५७,०६४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ७० अंकांनी घसरून १६,९८३चा बंददिला.
मंगळवारी केंद्र सरकारने दुसऱ्या तिमाहीची जीडीपीची आकडेवारी जाहीर केली.दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.४ टक्के इतका वाढला.India’s GDP expands 8.4% in July-September quarter

जीडीपीच्या आकडेवारीमुळे बाजार वधारला सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढला. Market cheers GDP numbers Sensex up 619 points

बुधवारी बाजारात तेजी पसरली.मंगळवारी जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी व नोव्हेंबर महिन्यातील वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळालेला तब्बल १ लाख ३१ हजार ५२६ कोटींचा महसूल या कारणामुळे सेन्सेक्स ६०० अंकांपेक्षा अधिक वाढला. नोव्हेंबर महिन्यातील सेवा कर चालू आर्थिक वर्षातला आतापर्यंतचा एका महिन्यातील दुसरा सर्वाधिक महसूल कर ठरला.(At Rs 1.31 lakh crore, November’s GST collection second highest since rollout). सेन्सेक्स व निफ्टीत १% पेक्षा जास्त वाढ झाली. नोव्हेंबर महिन्यातील ऑटो विक्रीच्याआकडयांनी त्या सेक्टर मध्ये जोश भरला. फार्मा(pharma ) वगळता बाकी क्षेत्रात तेजी होती. खास करून metal, auto, bank, energy, IT आणि PSU bank क्षेत्रात तेजी होती. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६१९ अंकांनी वधारून ५७,६८४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १८३ अंकांनी वधारून १७,१६६चा बंद दिला.

सलग दुसऱ्या दिवशी तेजी निफ्टी १७,४००.Market gains for second day Nifty reclaims 17,400

गुरुवारी वीकली एक्सपायरी च्या दिवशी बाजाराची सुरूवात सपाट झाली परंतु बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजी पसरवण्यात यशस्वी झाला.सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची वाढ झाली. बाजार बंद होताना दिवसाच्या उच्चतम पातळीवर बंद झाला. GDPआणि GST चे आकडे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल मधील घसरण यामुळे बाजारात जोश पसरला. बाजाराने नवीन विषाणूच्या बातमीला पचवले परंतु त्यासंबंधीच्या स्पष्टतेची बाजार वाट बघत होता.दिवसभरच्या कामकाजात सगळ्या क्षेत्रात तेजी होती.निफ्टीने १७,४०० चा महत्वाचा टप्पा पार केला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७७६ अंकांनी वधारून ५८,४६१ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २३४ अंकांनी वधारून १७,४०१ चा बंद दिला
सेन्सेक्स ७६५ अंकांनी घसरला.Sensex falls 765 points

अमेरिकन बाजारातील ६०० अंकांच्या तेजीमुळे शुक्रवारी बाजाराची सुरुवात उत्तम झाली. निफ्टीने १७,४८९ चा स्तर गाठला परंतु हा स्तर बाजार टिकवू शकला नाही. बाजारात जोरदार नफावसुली झाली. बाजार दिवसअखेर जोरदार घसरला सेन्सेक्स ८०० अंकांनी पडला.कर्नाटकमध्ये नव्या विषाणूचे सापडलेले दोन रुग्ण. बाजारातील दिग्गजReliance Industries, ITC, HDFC आणि HDFC Bank मधील नफावसुली,Rakesh Jhunjhunwala चा पाठींबा असलेल्या Star Health IPOला मिळालेला कमी प्रतिसाद ह्या गोष्टी बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरल्या. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७६४ अंकांनी घसरून ५७,६९६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी२०५ अंकांनी घसरून १७,१९६चा बंद दिला.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

4 Dec 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *