मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन …

 मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन …

धुळेमुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धुळ्यातील मानाचा गणपती खुनी गणपती ची विसर्जन मिरवणूक शहरातील जुने धुळे परिसरातून निघाली होती, त्यात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते.

गेल्या 128 वर्षा पासून मिरवणूक पारंपारिक वाद्य टाळ मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक निघत असल्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू असते कुठल्याही प्रकारचा गुलाल न उधळता केवळ पारंपारिक पद्धतीने पालखी आणि टाळ मृदुंगाच्या साथीने वारकरी पद्धतीने ही मिरवणूक निघत असते.
या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला पुरुष लहान बालके सोबत भाविक टाळ मृदुंग घेऊन सहभागी होत असतात.

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारी धुळ्यातील खुनी गणपती विसर्जनाच्या वेळी जामा मस्जिद समोर मशिदीच्या प्रमुखाच्या हस्ते गणपतीची आरती करण्याची परंपरा देखील आहे. त्यानंतर सायंकाळपासून धुळे शहरातील प्रबोधनाची परंपरा जोपासणारे विविध मंडळ आपापल्या मंडळाची गणेशाची विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले होते. Immersion of Mana Khuni Ganapati…

ML/KA/PGB
28 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *