नैतिकता असेल तर आव्हाडांना निलंबित करा

 नैतिकता असेल तर आव्हाडांना निलंबित करा

पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर जितेन्द्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule  यांनी केली आहे.If moral, suspend the challenge

चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज नेते असून यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा करत एक नवा स्टंट केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड आणि विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचे समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांविरोधी गैरकृत्य करणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्ष निलंबनाची कारवाई करावी अशी ही मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची लोकांमध्ये माहिती करून देणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी असा पत्र लिहिण्याचे अभियान राबवले जात आहे याविषयी बावनकुळे बोलत होते.. राज्यातील 5 कोटी 65 लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला असून नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे म्हणाले.

फ्रेंड्स ऑफ भारतीय जनता पार्टी या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या समर्थन करणाऱ्या नागरिकांची फोन द्वारे नोंदणी केली जात असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.चित्रा वाघ यांच्या पत्रकारांसोबत झालेल्या आणि पत्रकारांच्या बहिष्कारावर भाष्य के आणि चित्रा ताई मागच्या दोन वर्षात कधीच पत्रकारांशी बोलताना चुकल्या नाहीत असे बावनकुळे यांनी आवर्जून सांगितले.

ML/KA/PGB
14 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *