हैदराबादचे प्रसिद्ध चिकन 65

 हैदराबादचे प्रसिद्ध चिकन 65

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोन लेस चिकन ब्रेस्ट बाइट साइज्ड तुकडे करून. हे मेन. त्याला मॅरिनेट करायला गरम मसाला किंवा भाजलेले धने जिरे पूड एक दीड टी स्पून ,लाल तिखट पूड एक टी स्पून. अर्ध्या लिंबाचा रस व एक टी स्पून मीठ. व नंतर घालायला कॉर्न स्टार्च दोन टे स्पून आणि एक अंडे.

हरा मसाला: पुदिना पाने अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कढिपत्ता पाने आठ दहा, तीन किंवा चार मिरच्या उभ्या चिरून. बरोबरीने तीन किंवा चार लसूण पाकळ्या सोलून व अर्ध बोबड्या ठेचून.

तळायला तेल

सॉस साठीचे साहित्यः एक वा टी ताजे थोडे आंबट दही, मीठ धने जिरे पावडर लाल तिखट आले लसूण पेस्ट प्रत्येकी दीड टी स्पून. किंवा चवी प्रमाणे थोडे कमी जास्त करा. फार मसालेदार करायचे नाही.

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम चिकनचे बाइट साइज्ड तुकडे करून घ्या व अर्ध्या लिंबाचा रस, तिखट मीठ आणि धणे जिरे पूड आले लसूण पेस्ट. ही देखिल ताजी बनवून घेत ली तर जास्त छान चव येते. नाहीतर रेडिमेड पेस्ट चालेल. १५ मिनिटे मॅरिनेट करून ठेवावे. मग एक अंडे फोडून ह्यात घालायचे आणि कॉर्न स्टार्च पावडर सर्व तुकड्यांना नीट लावून घ्यायची.

आता तेल कढईत गरम करत ठेवा व मध्यम आचेवर सर्व तुकडे तळून घ्या. दोन ब्रेस्ट च्या पीसेस ना चार घाणे होतात तळणीचे. तुकडे करपू द्यायचे नाहीत.

आता सॉस तयार करून ठेवा तो परेन्त तुकडे गार होतील थोडे बहुत. एका बोल मध्ये दही फेटून घ्या. त्यात आले लसूण पेस्ट लाल तिखट
धणे जिरे पूड / नसली तर गरम मसाला. हे काही नसेल तर छोले मसाला किंवा चिकन चा मसाला एवरेस्ट चा मिळतो तो ही चालेल.
हे सर्व नीट मिसळून घ्या. ह्यात एक चमचा ठेवा.

आता परत थोडे तेल गरम करा. चालत असल्या स तळणीचे तेल घेतल्यास हरकत नाही. तो वास नको असेल तर दुसरे फ्रेश तेल दोन चमचे
वेगळ्या कढईत घ्या. हे मध्यम आचेवर गरम झाले की पुढील क्रमाचेच पदार्थ घाला. पहिले लसणीचे अर्धबोबडे ठेचून घेतलेले तुकडे. हे हल्के गुलाबी झाले की उभ्या चिरलेल्या तीन किंवा चार हिर व्या मिरच्या. व कढीपत्ता. हे नीट तळले गेले की चमच्याने वेगळ्या बोल मध्ये तयार ठेवलेला सॉस घाला . सॉस घालताना आच कमी करा. कारण अंगावर उडू शकतो. हे घालून सर्व नीट मिसळून घ्या. सॉस दोन मिनिटे उकळू द्या. कच्चे पणा गेला की चिकनचे तुकडे घाला. व कमी आचेवर पाच सात मिनिटे सिमर करा.

आता कोथिंबीर व पुदिना घाला. दोन मिनिटे परतून गॅस बंद करा सॉस अंगाबरोबर राहिला पाहिजे. फार पाणचट झाला नाही पाहिजे.
आता प्लेट मध्ये घालून सर्व्ह करा.

Hyderabad’s Famous Chicken 65

PGB/ML/PGB
28 Nov 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *