नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील व जगातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

 नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील व जगातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४४ ला  प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “शुभकृत” आहे.How will the new year be? Predicting the future of the country and the world

नवीन वर्षाची पत्रिका ही मिथुन लग्नाची आहे. ,नवमस्थानी गुरु /शुक /नेपचून, दशम स्थानी (कर्म स्थानी) रवी/चंद्र /बुध. षष्ठ स्थानात केतु.अष्टमात मंगळ /शनी /प्लूटो, व्यय स्थानी राहू  असे ग्रह आहेत.

आगामी वर्ष आपल्या देशाला कसे जाईल ?

 

गेली २ वर्षे संपूर्ण जगावर आलेल्या संकटामुळे मानवी जीवनात नैराश्य पसरले होते परंतु नवीन वर्षात बऱ्याच प्रमाणात सकारात्मकता जाणवेल. कोरोनासारख्या रोगावर नियंत्रण मिळवण्यात भारत यशस्वी होईल. उद्योगधंद्यांची स्थिती हळूहळू सुधारेल उत्पादन क्षमता वाढेल. भारताचा विकासदर (GDP) हळूहळू वाढेल. देशात टुरिस्टांची संख्या वाढेल. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

ह्या वर्षी देशाला आंतरराष्ट्रीय संस्थेत मोठे पद मिळण्याची शक्यता ,देशाच्या प्रतिनिधींची नियुक्ती होण्याची शक्यता स्त्रियांना सत्तेत मोठे पद मिळेल.कायद्यात मोठे बदल होतील.साहित्यिक ,पत्रकार,संपादक यांचा गौरव होईल (पुरस्काराने सन्मानित) सरकारी पद मिळण्याची शक्यता.

धर्मसंमेलने,मेळे,वारी,उत्सव मोठया प्रमाणात साजरे होण्याची शक्यता. मोठया प्रमाणात संशोधने होतील. सांस्कृतिक कार्यांची रेलचेल वाढेल. मोठे चित्रपट प्रसिद्ध होतील. कलाकार विशेषतःस्त्री कलाकारांना मोठे पुरस्कार मिळतील. कलाकारांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळतील.मोठे मनोरंजनाचे कार्यक्रम/पुरस्कार सोहळे साजरे होतील.

व्यापारात वाढ होईल.मंत्री तसेच पर्यटन सचिवांचे कामाकरिता परदेश दौरे होण्याची शक्यता. Trade will increase. Possibility of foreign trips for work of Minister and Tourism Secretary.

महाराष्ट्रात कृषी,उद्योग, वाहन उद्योग,गृहनिर्माण या क्षेत्रात वृद्धी होईल. जमिनींचे भाव वाढतील. बहुमंजीली इमारतींच्या निर्माणा संबंधीचे प्रश्न सुटतील.

हे वर्ष सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल आहे. काही ठिकाणी सत्तापरिवर्तनाचे योग. काही राज्यात नेत्तृवबदलाची शक्यता अधिक Some states are more prone to change of leadership. पक्ष फूटतील. काही षडयंत्र व घोटाळे उघड झाल्याने देशाच्या प्रमुखाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता. राजकीय व्यक्ती,पंतप्रधान,राष्ट्रपती यांनी आपल्या सुरक्षेची  विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

ह्या वर्षी देखील देशात/जगात नैसर्गिक आपत्ती/संकटे येतील(Natural disasters)

अग्निप्रलय, भूकंप, स्फोटक घटना,खाणीत अपघात.  वीज पडून /लागून मृत्यू,दरड कोसळणे/उंचावरुन पडणे अश्या घटना घडतील.मिलटरीच्या अधिकाऱ्यांना, डॉक्टर्स,विशेषतःशस्त्रक्रिया करणारे सर्जन,युद्धतज्ञ यांना प्रतिकूल/मृत्यू. खेळाडूंना प्रतिकूल असण्याची शक्यता तसेच त्यांच्यावर  टीका/टिप्पणी/आरोप होण्याची शक्यता अधिक आहे. ज्येष्ठ खेळाडूंचा मृत्यू होण्याची शक्यता. देशातील सैन्य,आरमार,पोलीस ,मिलिटरी,आर्मी,नेव्ही यांना प्रतिकूल. जहाजांचे अपघात होण्याची शक्यता

मोठ्या पदावरील लोकांना प्रतिकूल

Adverse to people in high positions

ज्येष्ठ/वयोवृद्ध राजकीय नेते,उच्च अधिकारी,व्यापारी,,उद्योगपती,गणमान्य व्यक्तींना प्रतिकूल मृत्यूची शक्यता. ज्येष्ठ कारखानदार/उद्योगपटू यांना प्रतिकूल./मृत्यू होण्याची शक्यता. ज्येष्ठ कायदेतज्ञ् प्रतिकूल. स्टील/लोखंड उधोयोगधंद्याशी संबंधित व्यक्तींना प्रतिकूल

गुंडगिरी/हिंसा,अपहरणाचे प्रकार वाढतील. सार्वजनिक असंतोष वाढेल. काही सरकारी/आर्थिक तसेच धार्मिक/न्यायक्षेत्रातील घोटाळे उघडकीस येतील व शिक्षेस पात्र ठरतील राजघराण्यातील स्त्रियांना प्रतिकूल. काही कारणांमुळे/किंवा खासदारांच्या वागण्यामुळे संसद स्थगित होईल.काही मंत्र्यांच्या बेसावधपणे दिलेल्या वक्तव्यांनी संसदेत तणावाचे /विरोधाचे वातावरण उत्पन्न होईल.काही संसद सदस्यांचे अपघात होण्याची शक्यता

काही ठिकाणी जेल,सुधारगृहे किंवा हॉस्पिटल मध्ये अनैतिक कार्ये घडण्याची शक्यता. तसेच मानवी अवयवाची चोरी तसेच मुलांची अदलाबदली अश्या प्रकारच्या घटना वाढण्याची शक्यता

ह्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहील. Rainfall will be good this year.

मुंबई ,कोकण,कोल्हापूर ,सांगली ,गोवा, दक्षिणेकडील राज्ये,बिहार,आसाम,उत्तर प्रदेश या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता.

शेअर मार्केट Stock market

गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात जसे चढउतार होते तसे ह्या वर्षी दिसण्याची शक्यता कमी राहील. एप्रिल नंतर हळूहळू बाजारात थोडी स्थिरता जाणवेल. ह्या वर्षी अमेरिकन मार्केट मध्ये बरीच अस्थिरता जाणवेल.

जगभरात काय घडेल What will happen around the world

वैश्विक/जगत कुंडलीचा विचार केला असता या वर्षी  पश्चिमेकडील देशांमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता. पूर्वेकडील देशांमध्ये बंड/सत्तांतर आंतरिक कलह दिसेल,उत्तरेकडील देशांमध्ये कमी पीक निर्माण होईल, दक्षिणेतील देशांमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता,जगातील काही देशात मोठ्या प्रमाणात उत्पात,हिंसक प्रदर्शन, पाण्याची कमतरता /दुर्भिक्ष जाणवेल.

रशिया ,पोलंड,स्वीडन किंवा अरबस्थान मध्ये अराजकता माजण्याची शक्यता अधिक. शत्रू समवेत युद्धाची शक्यता वाढेल. तेथील सरकारची डोकेदुखी/त्रास वाढेल. काही घोटाळे बाहेर येतील. अतिरेक्यांपासून धोका. देशात अशांतता. खास करून रशिया येथील सत्तेवर असणाऱ्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा मृत्यूची शक्यता अधिक. काही लोकांच्या आत्महत्या किंवा गूढमृत्यू होण्याची शक्यता. सत्ता आणि प्रजा यांच्यात विरोध निर्माण होईल

फ्रान्स /इटली येथे अतिवृष्टीची संभावना.येथील विरोधी पक्षाच्या मनासारख्या गोष्टी घडतील.

चीन जल आणि थल सेनेत अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर करून सैन्य क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करेल. परंतु चीन मध्ये/देशात, प्रजेत अस्थिरता असेल.

इंग्लंड,जर्मनी,पोलंड,डेन्मार्क सीरिया,पॅलेस्टाईन येथे वादळे तसेच आतंकवादी गतिविधी वाढण्याची शक्यता. राजकीय लोक आजारी पडतील किंवा तुरुंगवास भोगावा लागेल. अपहरणाच्या घटना घडतील. सरकारमध्ये अनपेक्षित बदल,अपघाती मृत्यू, विमान दुर्घटना तसेच भूकंप होण्याची शक्यता.

अफगाणिस्थान,ग्रीस येथे देखील स्फोटक घटना,राजकीय संकटे,पूर,चक्रीवादळे,बॉम्बस्फोट,देशात उलथापालथ अश्या घटना बघावयास  मिळतील. Such incidents will be seen.

भारतात देखील काही ठिकाणी बॉम्बस्फोट, स्फोटक  घटना,विषारी वायू किंवा विषारी प्रकारांमुळे मृत्यू ,तसेच मोठे पूर,वादळे ,चक्रीवादळे,भूकंप अश्या घटना घडतील. सीमेवर अशांतता पसरेल. चीन किंवा पाकिस्तान यांच्या कुरापती/षडयंत्र/आतंकवादी घटना वाढतील,जम्मू आणि काश्मीर यामध्ये अस्थिरता/अशांतता जाणवेल. देशद्रोही कारवाया वाढतील.

३० जून ते २८ जुलै,२६ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर ,२४ डिसेंबर ते २१ जानेवारी २०२३ व २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या  दरम्यान  जगात ठळक घडण्याची शक्यता अधिक आहे.

जितेश सावंत

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

4 Mar 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *