कसा असेल डिजिटल रुपया…

 कसा असेल डिजिटल रुपया…

मुंबई,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल सुरू असताना भारतीय अर्थ व्यवस्था आता एक नवीन झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.  रिझर्व्ह बँकेने (RBI) कालपासून घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरू करणार असून सध्या हे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार आहे. Now RBI Brings Digital Rupee- Know Detail How will the digital rupee be? या बदलामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, पेमेंट सिस्टम अधिक कार्यक्षम होईल आणि मनी लाँडरिंगला प्रतिबंध होईल असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी ९ बँकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक (एसबीआय), बँक ऑफ बडोदा (BoB), युनियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक यांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना हा डिजिटल रुपया नेमका कसा असेल, त्याचा वापर कसा करायचा याची उत्सुकता लागून राहीली आहे. 

जाणून घ्या डिजिटल रुपया बाबत

  • डिजिटल रुपयामुळे सध्याच्या चलनी नोटांची व्यवस्था बंद होणार नाही उलट, लोकांना व्यवहाराचा दुसरा पर्याय मिळेल. चलनी नोट प्रणाली आणि डिजिटल चलन प्रणाली दोन्ही कार्य करतील.

▪️  फिजिकल नोटची सर्व वैशिष्ट्ये डिजिटल रुपयांमध्ये उपलब्ध असतील – तसेच डिजिटल रूपीचे चलनी नोटात रूपांतर देखील करता           येईल.

▪️ डिजिटल रुपया UPI शी देखील  जोडला जाईल – जेणेकरून लोक पेटीएम, फोनपे सारख्या इतर महत्त्वाच्या वॉलेटसह व्यवहार करता           येतील.

  • मोबाईल वॉलेटमधून काही सेकंदात व्यवहार होतात, त्याचप्रमाणे डिजिटल चलनाचा देखील वापर केला जाईल. यामुळे रोख रकमेचा त्रास कमी होईल, ज्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम होईल.

▪️ डिजिटल रुपया ही बँकांची जबाबदारी नसून ती रिझर्व्ह बँकेची जबाबदारी राहील.

▪️ डिजिल रुपीमुळे नोटांची छपाई, बँकांच्या शाखा, एटीएमपर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाचणार – एका आर्थिक वर्षात रिझव्‍‌र्ह बँकेला केवळ           नोटा छापण्यासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात.

SL/KA/SL

2 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *