आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन एफआयआर हायकोर्टानं रद्द केले आहेत. त्यामुळं रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. High Court relief to IPS officer Rashmi Shukla
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना हे दोन्ही एफआयआर नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते.
क्लोजर रिपोर्टदरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडं, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता.
या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.
मुंबई हायकोर्टानं अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर रद्द केले आहेत. या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.
ML/KA/PGB
8 Sep 2023