हेलियमच्या पाळणाघरात झाला हेलियम डे साजरा…

सिंधुदुर्ग, दि. १८ ()एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक हेलियम दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम डे साजरा करण्यात आला. 18 ऑगस्ट 1868 साली सूर्यग्रहणाच्या दिवशी विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला होता. त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचे पाळणाघर म्हणून देखील संबोधले जाते.
सिंधुभूमी फाउंडेशन , सिंधुदुर्ग यांच्या वतीने मागील 15 वर्षे येथे हेलियम डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी हेलियम वायू भरलेले फुगे घेऊन मिरवणूक काढण्यात आली. ज्या ओट्यावर दुर्बीण ठेवून हेलियमचा शोध लागला होता त्या “साहेबाच्या ओट्याची” पूजा करण्यात आली .
उपस्थितांना हेलियम वायू बद्दलची माहिती देण्यात आली. या सोहळ्यात शालेय विध्यार्थ्यांसह जिल्हावासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून विजयदुर्ग किल्ल्यासमोर खगोलशास्त्र आणि मराठा आरमार याची माहिती देणारे म्युझियम लवकर बांधण्यात येणार असल्याची माहिती सिंधुभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष , माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी दिली.
ML/KA/SL
18 Aug 2023