डॉ.जगन्नाथ हेगडे यांचे काम खरंच प्रेरणादायी खासदार अरविंद सावंत
मुंबई, दि १७
समाजात कोणत्याही प्रकारचे सामाजिक काम कसे करावे आणि ते लोकांपर्यंत कसे पोहोचव्हावे हे कसब फक्त हेगडे यांच्याकडून शिकावे. त्यामुळेच मी नेहमी म्हणतो डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचे काम खरंच प्रेरणादायी असल्याचे जाहीर प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी या अभ्युदय नगर येथे आयोजित केलेल्या मधुमेह निर्मूलन जनजागृती कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले मधुमेह एकदा माणसाला चिकटला आहे की तो शरीरातून जात नाही. त्यासाठी तो शरीरात चिकटणार नाही याची दक्षता आपण कशी घ्यावी यासाठी जनजागृती चे काम केले जाते. हे जनजागृतीचे काम करणे म्हणजे एक मोठे शिवधनुष्य असून ते शिव धनुष्य पेलण्याची काम डॉक्टर हेगडे हे चांगल्या पद्धतीने करत आले आहेत आणि यापुढे देखील करत राहतील यात तिळमात्र मात्र शंका नाही.
मधुमेह हा फार घातक रोग असून नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. साखरचे पदार्थ खाताना हे पदार्थ आपल्या शरीरात कशा प्रकारे नियंत्रणात ठेवण्यात येईल याबाबत दक्ष राहिले पाहिजे. नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे त्यामुळे देखील आपल्या शरीरातून मधुमेह हा पूर्णपणे बाहेर जातो आणि आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो अशी माहिती प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांनी एका कार्यक्रमाला आपल्या भाषणातून दिली. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रॅली काढून फुगे सोडून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये लायन्स इंटरनॅशनल चे गव्हर्नर फिरोज कात्रक, डॉक्टर प्रागजी वाजा, एड हुझेफा घडीयली, फाल्गुनी शेठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. KK/ML/MS