कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

 कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहराला आज मेघगर्जना , विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं पंचायत समिती कार्यालय, जैन बोर्डिंग जवळ झाड कोसळल्याने एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जाहिरातींचे मोठ-मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे उडाले आणि काही ठिकाणी फाटले.

पावसाने उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना सुखद गारवा मिळाला. गेली दोन दिवस जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहिले. ढगाळ वातावरणामुळे पारा कमी झाला असला तरी उष्मा वाढला होता. सकाळी आठ पासूनच अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या.

बुधवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण झाले. सायंकाळी सहा वाजता आकाशात मेघ गर्जनेसह सोसाट्याचे वारे सुरु झाले. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या मात्र, त्यानंतर जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरचे तापमान ३९ डिग्रीपर्यंत पोहचल्याने उष्म्याने अंगाची लाहीलाही होत आहे. या पावसाने कोल्हापूरकरांना सुखद गारवा मिळाला. सोसाट्याचा वारा सुरु झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह उपनगरातील वीज गायब झाली.तब्बल दीड-दोन तास नागरिकांना अंधारातच रहावे लागले. वारे एवढे जोरात होते, रस्ते, इमारतीचे टेरेस वरील कचरा लोट आकाशात पसरले होते.

ML/ML/SL

24 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *