नागपुरात मुसळधार पाऊस
नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज सकाळच्या सुमारास नागपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी 9.45 वाजल्याच्या सुमारास संपूर्ण अंधार पडलेला होता. जणू सायंकाळ झाल्यासारखे भासत होते. वाहन चालकांना आपल्या वाहनाचे हेड लाईट सुरू करून वाहन चालवावे लागत होते अश्या प्रकारची परिस्थिती शहरात निर्माण झालेली आहे.
शहरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना देखील फटका बसला आहे.
ML/ML/SL
9 May 2024