बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सौताडा प्रवाहित
बीड, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या नंतर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून या भागामध्ये सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे नागरिकांना श्रावणी सोमवारचा आणि रक्षाबंधन रक्षाबंधन असूनही घराबाहेर पडता आले नाही.
जिल्ह्यातील सौताडा येथे असलेला रामेश्वरचा धबधबा जोरदार सुरू झाला आहे. श्रावणी सोमवार आणि पावसाळी पर्यटन या दोन्हींचाही आनंद या सौताडा येथे घेत आहेत.
ML/ML/SL
19 July 2024