विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट
नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढचे दोन दिवस नागपुरसह विदर्भात उष्ण लहरींसह वादळ वारे
वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाच्यावेळी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नका अशा सूचना क्रिडा आणि सांस्कृतिक विभागाने विविध संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत.
नागपूर सह विदर्भात सूर्याची दाहकता अधिकच वाढली असून दुपारी घराबाहेर पडणे नागरीकांना आत्तापासूनच कठीण झाले आहे..पुढचे दोन दिवस नागपुरसह विदर्भात उष्ण लहरींसह वादळ वारे
वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील तापमानाचे जुने विक्रम यंदाही मोडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली आणि गोंदिया वगळता विदर्भातील सर्व जिल्हे काल चाळिशीच्या पार होते.
नागपूरला ४०.२ अंश कमाल
तापमानाची नोंद झाली होती. उन्हाचा वेळी क्रिडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नका अशी सूचना क्रिडा तसेच सांस्कृतिक विभागाने विविध संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत.. Heat wave for next two days in Vidarbha
ML/ML/PGB
29 March 2024