हसन मुश्रीफांना अटकेपासून तूर्त दिलासा

 हसन मुश्रीफांना अटकेपासून तूर्त दिलासा


मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास ( ईडी) मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेश न्यायालयाने दिला आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत हा दिलासा आहे. Hasan Mushrif gets temporary relief from arrest

अटकपूर्व जामीन देण्यास विशेष
न्यायालयाने नकार दिल्यानंतर अटक टाळण्यासाठी हनस मुश्रीफ यांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यांची ही मागणी मान्य करून न्यायालयाने मुश्रीफ यांच्या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी ठेवली होती.

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठासमोर मुश्रीफ यांची याचिका गुरुवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने अतिरिक्त महान्यायवादी अनिल सिंह यांनी मुश्रीफ यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयानेही त्यांची मागणी मान्य करून प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. तसेच मुश्रीफ यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासाही तोपर्यंत कायम ठेवला.
कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी जवळपास ४० हजार शेतकऱ्यांकडून पैसे घेऊनही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांना समभाग दिले नाहीत आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली, अशा आरोपाखाली ईडीने गुन्हा दाखल करून मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांना आरोपी केले आहे.

ML/KA/PGB
13 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *