मुंबईत ३० ठिकाणी भीमयात्रा तर वरळीत भव्य लेजर शो

 मुंबईत ३० ठिकाणी भीमयात्रा तर वरळीत भव्य लेजर शो

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उद्या मुंबई भाजपा तर्फे २२७ वॉर्डमध्ये जयंती उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ३० ठिकाणी भीमयात्रा काढण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा लेजर शो वरळीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर सण, उत्सव जोरात साजरे करण्यात येत असून मुंबई भाजपाही या उत्सवांमध्ये मोठया हिरहिरीने सहभागी होत आहे. दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि शिवजयंती भाजपाने मोठया उत्साहात साजरी केली. आता त्याच प्रमाणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव भाजपा विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करणार आहे.

भाजपातर्फे उद्या १४ एप्रिल रोजी मुंबईतील २२७ वॉर्ड मध्ये ‍विविध कार्यक्रम होणार असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ७३ पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन भाजपा खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, मोर्चा आघाडीचे पदाधिकाऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार सहाही जिल्ह्यांचा दौरा करुन दिवसभरात विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सकाळी चैत्यभूमी येथे अभिवादन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या परेल येथील खोली क्र. ५०/५१, बी आई टी चाळ व दादर राजगृह येथे जाऊन अभिवादन करणार आहेत.

तसेच लोखंडवाला कांदिवली पूर्व,‍ दिंडोशी आरे कॉलनी, वर्सोवा जीवन नगर, कुर्ला नेहरु नगर, महाराणा प्रताप चौक माझगाव, कुलाबा, नायगाव, पंचशिल नगर २ सायन कोळीवाडा, चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते लाल डोंगर ते वाशी नाका तसेच गोवंडी स्टेशन, विक्रोळी, संविधान चौक मानखुर्द शिवाजी नगर, घाटकोपर पश्चिम, रमाबाई नगर घाटकोपर पूर्वसह भांडूप, मुलुंडसह एकुण ३० ठिकाणी जयंती निमित्त भीमयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिवाय ‍ठिकठिकाणी प्रतिमेला अभिवादन, भीमगीते, व्याख्यान, रुग्ण्‍ सेवा, व्हिलचेअर वाटप, आरोग्य शिबिर, वस्तीगृहातील विद्यार्थी संवाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपाचे खासदार, आमदार, नगरसेवकांसह मुंबई भाजपाचे ‍ पदाधिकारी यामध्ये सहभागी होतील.

वरळीत १६ एप्रिल रोजी लेजर शो

वरळी येथील जांबोरी मैदानात भाजपा पदाधिकारी संतोष पांडे यांच्या पुढाकाराने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा भव्य लेजर शोचे आयोजन रविवार, दि. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत करण्यात आले आहे.Bhimayatra at 30 places in Mumbai and grand laser show in Worli

२००x१०० फुटाच्या भव्य पडद्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन गौरव असलेला लेजर शो सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आला आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधूतेची शिकवण देणारे, आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब यांचे जीवन म्हणजे एक प्रचंड मोठा संघर्ष आहे.

त्यांचे विचार त्यांचे जीवन कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देणारे आहे, ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे या लेजर शोच्या माध्यमातून दाखविण्यात येणारा जीवनपट मुंबईकरांनी आवर्जुन पहावा, तरुणांनी तर हा कार्यक्रम चुकवू नये असे आवाहन, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

ML/KA/PGB
13 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *