डॉ प्रभा अत्रे यांना हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार….
ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.या वेळी प्रभा अत्रे यांना मानपत्र आणि एक लाख रुपयाचा धनादेश तसेच शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रभा अत्रे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच एकनाथ शिंदे यांनी देखिल भाषणातून गुरुकुल प्रतिष्ठान आणि प्रभा अत्रे यांचा देखिल सन्मान केला.Hariprasad Chaurasia Award to Dr Prabha Atre… त्यांनी अनेक कलाकारांच्या पिढ्या घडवल्या ही गौरवाची गोष्ट आहे .या कार्यक्रमात 90 बासरी वादकांनी आपली कला सादर केली. पुरस्कार देण्याची संधी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्या बद्दल आभार मानतो.ठाण्यातील कार्यक्रम आगळा वेगळा असतो.ठाण्यात कलाकारांच्या मागे आनंद दिघे यांनी सन्मान केला.ठाणेकरांना अभिमान आहे.
देशाचे सीमा ओलांडून भारतीय संस्कृती पोहचविण्याच काम प्रभा ताईंनी केलं आहे..त्यांची तपस्या आहे..प्रभा ताई यांचे गाणे ऐकताना मधुर वाटत..बाळासाहेब सांगायचे वयाने ज्येष्ठ असलो तरी मनाने तरुण राहील पाहिजे ..रोजच्या धकाधकीच्या जीवनात अश्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे संधीचे सोन केलं पाहिजे, ठाणेकर बदलत नाही आमच्या सारखे सर्वांचे जगणे तुमच्यामुळे सोपे झालं आहे..तुमच्या उपकाराची परतफेड होणार नाही ,सरकार सर्व घटकांचे आहे, सरकार कलाप्रेमी आहे , शास्त्रीय संगीताच्या साठी योजना मांडा त्याचा सन्मान केला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगून राज्याच्या वतीने अभिनंदन केलं.
ML/KA/PGB
22 Jan. 2023