राज्यात १ हजार ९८५ बिबट्यांचा अधिवास

 राज्यात १ हजार ९८५ बिबट्यांचा अधिवास

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने गुरुवारी (ता.२९) देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. त्यात मध्यप्रदेशचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.

देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३ हजार ८७४ असल्याचे जाहीर केले आहे. बिबट प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला. तो राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था यांनी देशातील विविध राज्यांच्या वन विभागांच्या मदतीने तयार केला आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाल्याचेही अहवालात नमूद आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १ हजार ९८५ असल्याचे सांगण्यात आले आहे. २०१८ साली ही संख्या १ हजार ६९० होती. या संख्येत १२२ बिबट्यांची भर पडली आहे. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहात असल्याची महत्त्वपूर्ण नोंद अहवालात नमूद आहे.

ML/KA/PGB
3 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *