भाजपमध्ये गटा तटाचे राजकारण चालू शकत नाही

 भाजपमध्ये गटा तटाचे राजकारण चालू शकत नाही

सांगली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कितीही मोठा नेता असला तरी भाजपात गटा तटाचे राजकारण चालणार नाही,असे करणारे फार काळ भाजपमध्ये राहणार नाहीत, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे, ते सांगली येथे प्रसारमाध्यमाशी ते बोलत होते.Group politics cannot work in BJP

भास्कर जाधव यांनी फालतू धंदे करू नये, विरोधकांनी कपटकारस्थान करून सत्ता मिळवली होती, आत्ता त्यांनी विरोधकाची भूमिका बजावली पाहिजे असे सांगून बावनकुळे म्हणाले,भाजप बरोबर सत्ता स्थापन केली ते बरोबर होते असे अजित पवार Ajit Pawar यांनाही आता वाटू लागला आहे असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज्यात मध्यवधी निवडणूक लागणार,या संजय राऊतांच्या विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला.राहिलेले आमदार टिकवण्यासाठी संजय राऊत मध्यवर्ती निवडणूक लागतील, असे बोलत आहेत.

काँग्रेस नेत्यांनी स्वतःच्या मुलांसाठी भारत जोडो यात्रा हायजॅक केली. यात्रेतून नेत्यांच्या मुलांना प्रमोट केले जात आहे. त्यामुळे यात्रा सर्वसामान्य लोकांची राहिली नाही अस सांगून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले राज्यात राहुल गांधी दौरा सुरू असताना अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे,सत्तेपासून पैसा आणि पैश्या पासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण आहे असा आरोप बावनकुळे यांनी यावेळी केला.Group politics cannot work in BJP

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *