गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष राज्यातील लोकांसोबत साजरे करताना विशेष आनंद होत आहे.
देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
ML/KA/SL
21 March 2023