क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना अजित पवार यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री शक्ती योगदान देत आहे, स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचे संपूर्ण श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याला आहे. संपूर्ण देश क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition in Legislative Assembly Ajit Pawar यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.Greetings from Ajit Pawar to Kranti Jyoti Savitribai
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत.
सावित्रीबाईंनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे काम केले. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रीयांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी यशस्वीपणे पार पाडली.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी फुले दाम्पत्याने केलेले कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील. जयंतीदिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांना विनम्र अभिवादन.
ML/KA/PGB
03 Jan. 2023