मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सरकारचा मदतीचा हात

 मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सरकारचा मदतीचा हात

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला असून ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली. Government’s helping hand to Maharashtra students in Manipur

स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित होते,
या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला, देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आश्र्वस्त केले आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालक यांना संपर्क केला. देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना येथे सुरक्षा मिळेल.

शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या वतीने तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्र प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

ML/KA/PGB
7 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *