गौराईच्या आगमनासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

कोल्हापूर दि ३१:– आज घरोघरी मंगळा गौराईच्या आगमनाचा दिवस, गणेशोत्सवात गौराईला महत्वाचे स्थान आहे. मंगळा गौराईसाठीचे पुजेचे साहित्य, मुखवटे खरेदीसाठी कोल्हापूरातील बाजारपेठा कालपासूनच फुलून गेल्या आहेत. महिला वर्गातून गौराईचे मुखवटे, पुजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. गौराईचे मुखवटे दोनशे रूपयांना तर गौराईची संपूर्ण मूर्तीसाठी 2 ते 5 हजार रूपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या कुंभारवाड्यात आकर्षक गौराईचे मुखवटे उपलब्ध झाले आहेत.ML/ML/MS