खुष खबर,अखेर मान्सून केरळात दाखल

थिरुवनंतपुरम, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णतेच्या झळांनी त्रस्त होऊन मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी IMD आनंदाची बातमी दिली आहे. दरवर्षी पेक्षा तब्बल एक आठवडा प्रतिक्षा करायला लावल्यानंतर आज मान्सून केरळ राज्यात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने (IMD) केली आहे.
वादळाचा अडसर दूर झाला
अरबी समुद्रातील बिपरजॉय वादळाने मान्सूनचा मार्ग अडवला होता. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस मान्सून दाखल होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले होते. पण बिपरजॉय आता पाकिस्तानच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे मान्सूनचा केरळमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मॉन्सूनने आज केरळच्या बहुतांश भागासह लक्षद्वीप बेटे आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासांत मॉन्सून केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये प्रगती करू शकतो, अशी माहिती आयएमडीने प्रसिद्ध केली आहे.
SL/KA/SL
8 June 2023