मराठीतील चांगले साहित्य परकीय भाषांमध्ये अनुवादीत होणे आवश्यक : प्रा.उषा तांबे
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठीतील चांगले साहित्य परकीय भाषांमध्ये अनुवादीत होणे आवश्यक आहे. तसे झाले तर मराठीचे दर्जेदार साहित्य जगात पोहचेल आणि त्याचा वाचक वर्गही वाढेल.त्याच प्रमाणे मराठी साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचले जाणे आणि मराठी लेखकांची पुस्तकेही वाचकांनी विकत घेऊन वाचले पाहिजे.असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे यांनी केले.Good literature in Marathi must be translated into foreign languages : Prof. Usha Tambe यावेळी महाराष्ट्र शासनाने संमेलनासाठी दोन कोटी रुपये मानधन देण्याचे मान्य केले असल्याचे सांगून प्राध्यापक तांबे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नाला सविस्तर उत्तरे दिली .
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे 3 ते 5 फेब्रुवारी 2023 ला होत आहे.यानिमित्ताने प्रा .उषा तांबे यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाने आज 27 जानेवारीला वार्तालाप आयोजित केला होता.यावेळी बोलताना प्रा.तांबे यांनी संमेलनाची सर्व माहिती दिली.
मराठी वाचकांना आता विविध पर्याय उपलब्ध आहेत .मात्र तरी देखील मराठी साहित्यिक वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहितात. त्यांच्या आवृत्या हजार- दीड हजार प्रतीच्या असतात. त्यांना वाचकांचे पाठबळ लाभले तर आवृत्या ही निघतील. आता मध्यमवर्गीयांचे खरेदीची क्षमताही वाढली आहे .मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा असा ठराव करून आम्ही शासनाकडे पाठवतो.पण त्याचा पाठपुरावा करण्या इतकं मनुष्यबळ आमच्या कडे नाही.मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन चे थेट प्रेक्षपण 1999 मध्ये झाले होते.तसा प्रयत्न पुन्हा करायला हरकत नाही.असे प्रा .तांबे यांनी शेवटी सांगितले. दरम्यान या वार्तालापत पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले की जर साहित्य दर्जेदार असेल तर वाचक हमखास वाचतात. या प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण आणि उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर व जेयु भाटकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
ML/KA/PGB
27 Jan. 2023