शासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा

 शासनाकडून गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला विशेष दर्जा दिला आहे.

देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक तसेच आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली आहे असे पशुसंवर्धन विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले

ML/ML/PGB
30 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *