सरकारकडून लवकरच होणार सुवर्ण रोख्यांची विक्री

 सरकारकडून लवकरच होणार सुवर्ण रोख्यांची विक्री

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत असून 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान तुम्ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत सोन्यात गुंतवणूक करू शकता. सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond) नेहमी खरेदी करता येत नाहीत, यासाठी वेळोवेळी तारीख निश्चित केली जाते. यापूर्वी 22 डिसेंबरला खरेदी करण्याची संधी होती. आता पुन्हा एकदा सरकार गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करण्याची संधी देणार आहे.

सार्वभौम सुवर्ण रोखे हे सरकारी रोखे असून ते आरबीआयकडून जारी केले जाते. हे रोखे डिमॅटमध्ये रूपांतर करता येतात. यामध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत एका रोख्याची असते. यामाध्यमातून तुम्ही 24 कॅरेटच्या 99.99 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता. ऑनलाइन अर्ज केल्यावर आणि डिजिटल पेमेंट केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट उपलब्ध मिळते. कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने गुंतवू शकते.

बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे बीएसई आणि एनएसई प्लॅटफॉर्मवरून द्वारे सुवर्ण रोखे खरेदी करता येतील.

SL/KA/SL

6 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *