आजपासून वर्षभर ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे आयोजन
पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु.ल. देशपांडे यांची आज जयंती. या निमित्ताने पुणे येथे एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु. ल. परिवार’च्या सहयोगाने गेली २० वर्षे सातत्याने पुलोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी या उपक्रमाला ग्लोबल रूप देण्यात येणार आहे. दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जगभरात ग्लोबल पुलोत्सव‘साजरा होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि महोत्सवाचे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारतातील सुमारे २३ शहरांत आणि ५ खंडांमधील महत्वाच्या शहरांमध्ये ग्लोबल पुलोत्सव / या अनोख्या कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्य महोत्सवाचा आयोजनासाठी प्रत्येक शहरात मान्यवरांची ‘सल्लागार समिती’ तर पु.ल. प्रेमी आणि संस्थांची ‘कार्य समिती’ तयार करण्यात येणार आहे. विविधरंगी कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकारांना संधी देण्यात येणार असून वर्षभरातील पुलोत्सवात सुमारे १००० कलाकार, साहित्यिक आणि प्रमुख पाहुणे सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे आयोजन असलेल्या शहरात ‘पु. ल. स्मृती सन्मान’, ‘पु. ल. जीवनगौरव सन्मान’, ‘पु. ल. कृतज्ञता सन्मान’ आणि ‘पु. ल. तरुणाई सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहेत.
या महोत्सवाला राज्य सरकारही मदतीचा हात देणार आहे.
SL/KA/SL
8 Nov. 2022