भेंडवळच्या घटमांडणीतील भाकीत जाहीर , पीकपाणी सर्वसाधारण
बुलडाणा, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि गेल्या साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आले आहे..
ज्यामध्ये पीक पाणी सर्वसाधारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय भाकीत टाळण्यात आल आहे, मात्र देशाचा राजा अर्थात पंतप्रधान कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अक्षय तृतीयेला गावालगाच्या शेतामध्ये पारंपारिक पद्धतीने घट मांडणी करण्यात येते. या मांडणीमध्ये विविध धान्यांच्या राशीसह अक्षय तृतीयेच्या पूजेला वापरण्यात येणारे सर्व साहित्य वापरून ही मांडणी केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच सूर्योदयानंतर घट मांडणीत झालेल्या बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येतात. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून ही परंपरा वाघ कुटुंबीय सातत्याने जोपासत आहे. त्यानुसार जाहीर करण्यात आलेले भाकीत …..
पाणी परिस्थिती
पाहिला महिना – पाऊस कमी
दुसरा महिना – चांगला पाऊस
तिसरा महिना – भरपूर पाऊस
चौथा महिना – अवकाळी सारखा दमदार पाऊस राहील
पिके
यावर्षी खरीप पिके साधारण राहतील त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुग तसेच उडीद ही पिके साधारण येतील नंतर त्यावर रोगराई जास्त प्रमाण येईल… पिकांची नासाडी होईल..
रब्बी पिकांमध्ये गहू सर्वात जास्त चांगले पीक राहील…
राजकीय
घट मांडणी नुसार देशाचा राजा कायम राहणार असल्याचा अंदाज…
घट मांडणी पद्धत म्हणजे शेतात खड्डा, खड्डयात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य, अशा या ‘घट मांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो, बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, 350 वर्षांपासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते, या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते, राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो, सकाळी सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे भाकीत आज वर्तवले आहे…
ML/ML/PGB 11 May 2024