राज्यपालांच्या उपस्थितीत नाताळ निमित्त स्नेहमिलन
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन, मुंबई येथे नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ आणि नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर तथा सिस्टर्स तसेच ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.
ML/ML/SL
24 Dec. 2024