बरबटीचे पकोडे

 बरबटीचे पकोडे

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: 

२५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 

चवळी / बरबटी (कडधान्यातला प्रकार) : दोन वाट्या ( ७ ते ८ तास भिजलेली)
लसुण पाकळ्या – १०,१२
हिरव्या मिरच्या – २
धणे पुड – १ चहाचा चमचा
कोथिंबीर , जिरं, तिखट , मीठ अंदाजेच
बेसन पीठ – २ चहाचे चमचे
तळणा साठी तेल

क्रमवार पाककृती: 

हिवाळ्यात आवर्जून करण्या सारखी एक भन्नाट विदर्भिय पा.कृ.

लसुण , मिरची , कोथिंबीर, जिरं मिक्सरला फिरवुन घ्यायचं. आता चवळी / बरबटी पण मिक्सरला जाडसर फिरवुन घ्यायची..
त्यात वरिल सगळे साहित्य घालायचे, दोन चमचे बेसन (कमी जास्त करु शकता) घालुन छान एकत्र भिजवुन घायचे, वरुन एक पळी
तेलाचे कडकडीत मोहन घालायचे आणि मुगाचे पकोडे तळतो तसे तळुन घ्यायचे..

दही ,पदीना किंवा मिरची , कोथिंबीर, दह्याच्या चटणी किंवा टोमाटो सॉस ,बरोबर खुप छान लागतात.

Buckwheat pakoras

ML/ML/PGB
14 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *