रिकाम्या खाणीत होणार हरीत ऊर्जेची निर्मिती

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अर्थात वेकोली या केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या नागपूर येथील सार्वजनिक उपक्रम क्षेत्राच्या अधीन असलेल्या निकामी खाणी किंवा पडीक जागा आणि त्यांच्या भोवताली असणाऱ्या जलस्रोतांचा उपयोग करून एकात्मिक सौर तसेच जलविद्युत प्रकल्प स्थापन करून त्या माध्यमातून हरीत ऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय कोळसा सचिव अमृतलाल मीना यांनी आज नागपूर मध्ये वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष पी. प्रसाद, वेकालीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार प्रामुख्याने उपस्थित होते. मीना पुढे म्हणाले की अशा हरित ऊर्जेच्या माध्यमातून 400 मेगावॅट एवढी एकत्रित ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपुरातील खासदार औद्योगिक महोत्सव येथे ‘कोल गॅसिफिकेशन’ वर एका परिसंवादात सहभागी होण्यासाठी सचिव मिना आज नागपुरात आले असता त्यांनी कॉल गॅसिफिकेशन मध्ये उद्योजकांचा सहभाग वाढवण्यासाठीच्या योजनांची माहिती दिली.
नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठी ₹8,500 कोटी व्यवहार्यता अंतर निधी योजनेला मंजुरी दिली. सरकारी मालकीच्या प्रकल्पांसाठी अनुदान आणि सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांसाठी बोली यासह तीन श्रेणींमध्ये निधी दिला जाईल.
कोळशापासून कृत्रिम नैसर्गिक वायू, डायमिथाइल इथर आणि अमोनियम नायट्रेट तयार करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये खाजगी कंपन्यांना कॉल गॅसिफिकेशनचे प्रकल्प स्थापण्यासाठी डब्ल्यूसीएलच्या पडीक जागेचा उपयोग करण्यात येईल. सदर जागा अशा उद्योगांना लॉंग टर्म लिज – भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. कॅपिटल व्हेंचर किंवा खाजगी कंपन्यांना सुद्धा त्यांच्या मालकीच्या कोल गॅसिफिकेशनचे प्रकल्पाच्या माध्यमातून ‘रेवेन्यू शेअरिंग’ मॉडेल वर सरकार सोबत करार करता येईल असे देखील सचिव मीना यांनी यावेळी सांगितले .
खाजगी कोल गॅसीफेकेशन करणाऱ्या कंपन्यांना सरकारतर्फे 1000 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. Generation of green energy in an empty mine
ML/KA/PGB
28 Jan 2024