छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जन उत्साहात

 छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जन उत्साहात

छ. संभाजीनगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांच्या जय्यत तयारीत सकाळपासूनच विसर्जन सुरू झाले. पोलिसांनी यासाठी २२६ अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

राजा बाजारमधील शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालक मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजेपासून शहरातले १७ प्रमुख मार्ग विसर्जन पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

शिवाय देखावे, ढोल पथकांसह गणरायाची मिरवणूक निघाल्याने या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिके मार्फत शहरात ५० ठिकाणी संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
सार्वजनिक मंडळातील गणेश विसर्जनासीठी १२ ठिकाणी कृत्रिम तलाव आणि विहीरींची सोय करण्यात आली आहे.

ML/KA/SL

28 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *