महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

 महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

ठाणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार आज गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, अभिनेते विजय गोखले, साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ, आ. संजय केळकर, माजी खा. डॉ. संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले , अभिनेते, निर्माते मंगेश देसाई, विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आदिनाथ कोठारे हे देखील विशेष उपस्थित होते.

सुरुवातीला मराठी चित्रपट सृष्टीचा प्रवास गायन आणि नृत्याच्या माध्यमातून गंधारच्या कलाकारांनी सादर केला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कम (११ हजार १११ रूपये) देऊन कोठारे यांना यावेळी गौरविण्यात आले. गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्षे होते.

मी बालनाट्य क्षेत्रात भव्यदिव्य कलाकृती निर्माण करणार आहे त्यासाठी गंधार या कला संस्थेला सोबत घेऊन काम करणार आहे असे प्रतिपादन कोठारे यांनी यावेळी केले.

ML/KA/SL

14 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *