कोल्हापुरात झालं गणरायाचं आगमन

 कोल्हापुरात झालं गणरायाचं आगमन

कोल्हापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरकरांनी लाडक्या बाप्पाचं आज वाजत गाजत स्वागत केले. सलग दहा दिवस हा चैतन्याचा सोहळा सुरू असणार आहे. भक्ती आणि श्रद्धेचं पर्व आजपासून सुरू झाले. बाप्पांच्या आगमनासाठी सर्वत्र धामधूम होती.
“गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात आज कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावानं स्वागत केलं.भक्ती आणि आणि श्रद्धेचं पर्व असलेला गणेशोत्सव आजपासून सुरू होत आहे.

गणरायाचं यंदा निर्बंध मुक्त आगमन होत आहे.अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसंच घरगुती गणेश मूर्तींचं आज आगमन झालं. बाप्पांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. गणेश आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या.

रस्त्यांवरील खड्ड्यातून वाट काढत अनेकांनी बाप्पांना वाजत गाजत घरी नेलं. मंडळांच्या पारंपरिक गणेशमूर्तीं सोबतच प्रतिवर्षी नवनवे पॅटर्न बनत असतात. यंदाही अयोध्या मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज, महादेवाचा अवतार, चांद्रयान मोहीम तीन अशा विषयांशी अनुषंगिक गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या रांगड्या मराठमोळ्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाची प्रतीक्षा आबाल वृद्धांना वर्षभर लागू असते. यंदाच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा संपली असून आज पासून मंगलमय सोहळ्याला प्रारंभ झाला.

ML/KA/SL

19 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *