पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपतीचे विसर्जन.

 पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपतीचे विसर्जन.

नांदेड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नांदेड मध्ये मोठ्या उत्साहात आज गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने नांदेड च्या उषा रेसिडेन्सी सोसायटीने पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन बाळगोपाळ आणि अबाल वृद्धांच्या उपस्थितीत सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले. नांदेड मध्ये गोदावरी नदी बंदा घाटावर आणि आसना नदी मध्ये शहरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. Ganapati’s immersion of environmental supplement shadu soil.

प्रशासनाने विसर्जनाची पूर्ण तयारी केली होती, प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची टीम तयार होती तर नदी काठावर जीवन रक्षक तैनात करण्यात आले होते.

ML/KA/PGB
28 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *