गणपती-गौराई : व्रतकथा तथा उपासना आणि वर्तमानकालीन महत्त्व – भाग-2
भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आपल्या घरोघरी श्री गणेशाचं आगमन होतं. हजारो वर्षांची ही परंपरा आपण श्रद्धेने, भक्तीभावाने जपली आहे. प्रत्येक गणेशभक्त आपापल्यापरिने गजाननाचे स्वागत, आराधना, उपासना आणि व्रतवैकल्य करतो. या साऱ्या उपासना, सणवार, व्रतवैकल्यांतून आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी अनेक महत्त्वाची शाश्वत तत्व आणि मूल्य सांगून ठेवली आहे. यांतील अर्थ समजून घेऊन जर आपण गणपतीची, हरतालिकेची, गौराईची आराधना, पूजा केली तर आपण यातून अधिक समाधान मिळवू शकतो. नव्या जुन्याची सांगड घालत, त्याचे वर्तमानकाळातील मोल जाणून घेऊन ही मौलिक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न MMC News नेटवर्क सातत्याने करत आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक प्रा. मेधा सोमण यांच्याकडून हरतालिका व्रते,गणेश आराधना,ऋषि पंचमी, गौराई या व्रतांची शास्त्रशुद्ध माहिती,यामागील परंपरा, कथा जाणून घेतल्या आहेत. गणेशाची आराधना अधिक समजून उमजून करण्यासाठी हा विशेष भाग अवश्य पहा.